Saturday, January 18, 2025

Latest Posts

विधानसभा निवडणुकीत दादांची राष्ट्रवादी इतक्या जागांवर लढणार

| TOR News Network |

Ajit Pawar Latest Meeting : लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अशात महायुतीत असलेल्या घटक पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mahayuti seat sharing) भाजप,शिवसेना व राष्ट्रवादी विधानसभा निहाय उमेदवार ठरवत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस किती जागांवर विधानसभा लढणार याची माहिती अजित पवार यांनी नुकतेच घेतलेल्या बैठकीत दिली आहे.(Ajit Pawar seat sharing Meeting) पक्षांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सांगितले.(Ajit Pawar Meeting On Vidhan Sabha)

लोकसभेत पराभवाचा झटका बसल्यानंतर महायुतीलमधील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि मेळावे सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ८० जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वत: अजित पवार यांनीच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.(Ajit Pawar Order to prepare for vidhansabha) तसेच किती जागांवर उमेदवार उभे करणार? हे ही सांगितले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने ८५ जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. महायुतीमधील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार असल्याचे अजित पवार यांनी आमदारांना सांगितले.(Ajit Pawar On Mahayuti)

विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकरच होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८५ जागा विधानसभा घेणारच असल्याचा दावा अजित पवार यांनी बैठकीत केला.(Ajit Pawar Claim 85 seats ) पक्षांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सांगितले. तसेच यावेळी आमदारांना काय करावे आणि काय करु नये? यासंदर्भातील टीप्स दिल्या. (Ajit Pawar Tips To Mla)

अजित पवार यांनी मित्र पक्ष सोबत वादग्रस्त विधान टाळा, असे सर्व आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते यांना बैठकीत सांगितले.(Avoid Controversial Statements) शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा. लाडली बहीण, बसमध्ये महिला अर्ध्या दारात तिकीट तसेच इतर लोक कल्याणकारी योजना जनतेसाठी महायुतीच्या सरकारने सुरु केल्या आहे. त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये करावा, असे त्यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss