Monday, January 13, 2025

Latest Posts

काँग्रेसच्या उमेदवाराने थेट भाजपाच्या कार्यालयातच उघडली मोहब्बत की दुकान : व्हिडिओ व्हायरल

Bunty Shelke Latest News : नागपूर मध्य मतदारसंघात काँग्रेसकडून बंटी बाबा शेळके हे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपाने प्रवीण दटके यांना रिंगणात उतवले आहे.  (Bunty shelke vs pravin datke) या मतदारसंघात चुरशीचा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वेळी बंटी शेळके केवळ ४ हजार मतांनी पराभूत झाले होते. मात्र आता बंडखोरी नंतर ही पहिलाच विधानसभा निवडणुक आहे. राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. त्यामुळे कोणता उमेदवार विजयी होईल याचा अंदाच आत्ताच बांधता येणे कठीण आहे. तसेच अपक्ष उमेदवारांची संख्या देखील भरपूर आहे.त्यामुळे दिग्गज देखील चांगलेच कामाला लागले आहेत. सध्या प्रचाराच्या धुमधडाक्यात बंटी शेळके यांच्या एका कृतीने सर्वच जण अवाक झाले आहेत. ते पळत पळत थेट भाजपाच्या प्रचार कार्यालयात घुसले. (Bunty shelke in bjp office) तिथे असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांशी त्यांनी हस्तांदोलन तर केलेच. पण एका ज्येष्ठ भाजप नेत्याचे आशीर्वाद सुद्धा त्यांनी घेतले. इतकेच नाही तर मनात कोणतीही कटुता न ठेवता भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिला. मोहब्बत की दुकानची ही कृती सर्वांनाच आवडत आहे.

 

गेल्या काही वर्षांपासून पक्षीय लोकशाहीकडे झुकलेल्या भारतात असं चित्र फार दुर्मिळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वी राजकीय नेते, पदाधिकारी यांचे मतभेद असले तरी मनभेद नव्हते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याची जागा खूनशी राजकारणाने आणि बदल्याच्या राजकारणाने घेतल्याचा आरोप होत आहे. बंटी शेळके आणि स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची ही कृती अनेकांना भावली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(Bunty shelke video goes viral)

विदर्भात भाजप आणि काँग्रेसमध्ये यावेळी काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. लोकसभेत केवळ दोन जागांवर भाजपाला समाधान मानवं लागलं होते. आता विधानसभेत चित्र पालटवण्यासाठी भाजपानं शड्डू ठोकले आहेत. नागपूरमध्ये तर दोन्ही पक्षात कडवी झुंज दिसून येत आहे. पण नागपूर मध्य मतदारसंघात मात्र एक वेगळीच घटना घडली.

 

Congress candidate opens Mohabbat ki Dukan directly in BJP office: Video goes viral

Latest Posts

Don't Miss