Monday, November 18, 2024

Latest Posts

क्राँसवोटिंग प्रकरणी काँग्रेसचे हे आमदार रडारवर : 19 जुलै रोजी मुंबईत बैठक

| TOR News Network |

Cross Voting Latest News : विधानपरिषदेच्या निवडणुकीत झाल्या क्राँसवोटिंग प्रकरणात आता काँग्रेस पक्ष अॅक्शन मोडवर आले आहे. (Vidhan Parishad Election 2024) या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा ते सात आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केल्याप्रकरणी 19 जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाई संदर्भात निर्णय होणार आहे. (Congress Meeting on cross voting) या बैठकीला काँग्रेसचे (Congress MLA) महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार आहेत. (Ramesh Chennithala) विधान परिषद निवडणुकीत पक्षाची सहा ते सात मते फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पक्षाचे आदेश कोणी डावलले आणि फुटीर आमदार कोण हे समजल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole on cross voting)

ही बैठक आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ निश्चितीवर चर्चा करण्यासंदर्भात होत आहे.(Congress meeting in mumbai) मात्र याच बैठकीत फुटीर आमदारांसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान काही आमदार काँग्रेसच्या रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे. (Congress Mla on radar)

विधान परिषदेच्या मतदानापूर्वी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांमी आमची चार मतं फुटणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. शिवाय ते चार जणं कोण याचे संकेतही दिले होते. विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याशिवाय विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी फुटलेल्या आमदारांची नावं सांगितली होती. (Vijay Wadettiwar on Cross voting Mla) यावेळी वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकींचे वडील यापूर्वीच काँग्रेस सोडून गेले आहेत. नांदेडचे दोन आमदार अशोक चव्हाणांसोबत होते. आमदार सुलभा खोडके यांनीही पक्षविरोधी मतदान केलं. अशांवर कारवाई करण्यात येईल असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले होते.

हे आमदार असणार रडारवर

झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, शिरीष चौधरी, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे

Latest Posts

Don't Miss