Wednesday, January 15, 2025

Latest Posts

काँग्रेस नेत्यांचा ठाकरे गटाला कडक इशारा.. ती वेळ येऊ देऊ नका

| TOR News Network |

Congress Meeting Latest News : लोकसभेत निवडणूकीत सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद दिसून आले. याच विषयावर काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेत्यांनी आपली भूमिका मांडली. (congress committee Core Meeting) लोकसभेतील ‘सांगली पॅटर्न’ विधानसभा निवडणुकीत नको, असा सल्ला अनेक आमदारांनी मांडला. (No Sangli Pattern in Vidhansabha) यावेळी काँग्रेस आमदारांचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधातही नाराजीची सूर होता. (Congress Mla On UBT Shivsena) संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर 11 जुलै रोजी चर्चा झाली होती.(Mahavikas Aghadi Seat Sharing)  याचा आढावा आजच्या काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने आघाडी धर्म न पाळता परस्पर सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार घोषित केला होता. (Congress MLA Slams on Sangli Pattern) ठाकरे गटाची तिथे राजकीय ताकद नसताना आणि काँग्रेस पारंपरिक जागा असताना देखील दबावामुळे तिथे मागे हटावं लागलं होते. मात्र निकालानंतर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील तिथे विजयी झाले. त्यामुळेच सांगली पॅटर्न पुन्हा नको, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीत आडमुठेपणाची भूमिका घेतली होती, त्याची पुनरावृत्ती नको अशा सूचना दिल्ली काँग्रेस नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. विधानसभा जागा वाटपावेळी किमान काँग्रेस पक्ष जिथे प्रभावी आहे, त्या जागा सोडण्याची तयारी बिलकुल ठेवायची नाही, (Delhi Congress On Vidhansabha Seat Sharing) असं दिल्लीतील नेत्यांनी ठासून सांगितलं आहे.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस विधानसभेच्या 120-130 जागा लढवण्याची शक्यता आहे. (Congress to contest on 130 seats in vidhansabha )आगामी निवडणुकीत शिवसेना (UBT) 90-100 जागा तर राष्ट्रवादी-सपा 75-80 जागा लढवण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 13 लोकसभा खासदारांसह काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. शिवसेना ठाकरे गट 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आले आहेत.

Latest Posts

Don't Miss