Wednesday, January 15, 2025

Latest Posts

महाविकास आघाडी आक्रमक ; 24 ऑगस्टला दिली महाराष्ट्र बंदची हाक

| TOR News Network |

Maharashtra Band Latest News : बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन राज्याचे वातावरण सध्या तापले आहे. चार वर्षांच्या चिमुकलीवर केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नाही, (There is no law and order in the state) कायद्याचा धाक नाही आणि पोलीसांवर देखील गृहमंत्र्यांचा वचक नाही अशा टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केल्या जात आहे. (Mahavikas Aghadi Leaders Slams Maha Govt) विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना घेरले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. या प्रकरणावरुन काँग्रेसने मंत्रालयाबाहेर देखील आंदोलन छेडले.तसेच येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे.(Mahavikas Aghadi Call Maharashtra Band On 24th August)

काँग्रेस नेत्यांनी बदलापूर प्रकरणावरुन राज्य सरकारला घेरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Nana Patole On Maha Govt) नाना पटोले म्हणाले आहेत की, बदलापूरमध्ये झालेल्या प्रकारामुळे समाजमन हेलावून गेलं आहे. खऱ्या अर्थाने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लहान मुली देखील सुरक्षित नाही. ही घटना महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे. किंबहुना हे प्रकरण दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे. प्रकरणातील शिक्षण संस्था भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेत आहे. परिणामी, त्याचा उद्रेक समाजामधून झाल्याचे काल बघायला मिळाले.(Nana Patole on Badlapur Case) सत्ता आणि सत्तेची गर्मी त्यातून त्याची गुरमी या ठिकाणी बघायला मिळालीय, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

पुढे त्यांनी या प्रकरणावरुन महाराष्ट्र बंदाची हाक दिली आहे. नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचं काम रोज राज्यात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला अपमानित आणि काळ लावण्यात येत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या गंभीर प्रश्नावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये चर्चा केली. या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देत आहोत.(24th August Maharashtra Band) या आंदोलनात  महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष, घटक पक्ष, अनेक संघटना, शाळा कॉलेज, दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. सध्या घडीला महाराष्ट्रात जे अकार्यक्षम सरकार आहे, त्याला आपली जागा दाखवण्याचा प्रयत्न नागरिक करतील, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

त्याबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील बदलापूर घटनेबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.(Vijay Wadettiwar on Badlapur Case) वडेट्टीवार म्हणाले आहेत की, बदलापूर अत्याराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आलीय, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केलीय, (Wadettiwar on Ujjwal Nikam) ज्याने लोकसभेची निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Latest Posts

Don't Miss