Thursday, January 16, 2025

Latest Posts

मंत्रालयात लगबग ; उद्यापासून लागणार आचारसंहिता

| TOR News Network |

Vidhansabha Latest News : आचारसंहिता कधी लागणार, याबाबत राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही हालचालींना वेग आला आहे. अशात कोणत्याही क्षणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होऊ शकते.(Election commission news) विशेष म्हणजे उद्यापासूनच राज्यात आचारसंहिता लाग्ण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.(vidhansabha code of conduct) त्यामुळे  आज राज्य मंत्रिमंडळाची अंतिम बैठक होऊ शकते असेही सांगितले जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच महाराष्ट्राचा दौरा करत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर  आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत २६ नोव्हेंबर पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही आयोगाकडून सांगण्यात आले होते. तसेच, आचारसंहितेचा कालावधी ३० दिवसांचा असल्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते.

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी यांसह इतर छोट्या-मोठ्या पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बैठका,सभा, दौरे, मेळाव्यांना वेग आला आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभेच्या उमेदवारांचीही लवकरच घोषणा होऊ शकते. भाजपची केंद्रीय नेतृत्त्वासोबत दिल्लीत बैठक होणार आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही आज पक्षश्रेष्ठींची दिल्लीत भेट घेणार आहे.या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचेही सांगितले जात आहे.(Seat sharing to final)

Latest Posts

Don't Miss