Saturday, January 11, 2025

Latest Posts

मुख्यमंत्रिपद ही माझ्यासाठी छोटी गोष्ट

असे का आणि कोणाला म्हणाले शिवराजसिंह चौहान

सध्या मध्यप्रदेश मध्ये निवडणुकांचे जोरदार वारे वाहत आहेत. १७ नेव्हेंबरला तेथे विधानसभेसाठी मतदान होणार आहे.(Madhya Pradesh Assembly Election 2023)  नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात सभा घेत काँग्रेससह माजी मुख्यमंत्री कमलनाथवर जोरदार टीका केली. असे असताना भाजपने मात्र अजूनही मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण ? त्याच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना यंदा डच्चू मिळणार की तेच मुख्यमंत्री होणार अशा विविध चर्चेंना उधान आले आहे. (Cm Shivraj Singh Chouhan mahanale mukhyamantri pad he majhya sathi choti goshta) यातच एका माध्यमाशी बोलताना शिवराजसिंह चौहान यांनी याच प्रशनाचे उत्तर देताना  मुख्यमंत्रिपद ही माझ्यासाठी छोटी गोष्ट असल्याचे वक्तव्य केले आहे. असे का बोल्ले शिवराजसिंह चौहान.

मध्य प्रदेश हे राज्य भाजपसह काँग्रेससाठी महत्वाचं राज्य आहे. येथून २३४ आमदार निवडून येतात. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत येथे काँग्रेस जिंकली होती आणि कमलनाथ हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र भाजपाने ज्योतिरादित्य सिंधिया यांना हाताशी घेत  सरकार पाडले होते. यात काँग्रेसचे २२ आमदार फोडण्यात भोजपाला यश आले आणि विश्वास दर्शक प्रस्ताव जिंकत भाजपने तेथे सत्ता स्थापन केली.आता परत मध्यप्रदेशात निवडणुका होऊ घातल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. विजयासाठी  काँग्रेसन आणि भाजपाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. १७ नेव्हेंबरला तेथे विधानसभेसाठी मतदान होणार असून सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना भाजपने अध्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले नाही.अशात याच प्रशनांवर माध्याम त्यांना घेरत आहे.एका माध्यमाच्या प्रतिनिशी बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले.माझे मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित केले काय किंवा नाही केले काय याने माझ्या कार्य शैलीवर कोणताही परिणाम पडणार नाही. मी मुख्यमंत्री असो किंवा नसो मात्र माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहिल.तसेच आपण इतके वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहिलात मात्र यंदाच्या निवडणुकीत आपली मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार म्हणून घोषणा केली नाही  ते म्हणाले माझे नाव शिवराजसिंह  चौहान आहे आणि अशा मुख्यमंत्री बाबतच्या छोट्या गोष्टींचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर किंवा कामावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही काय आहात, हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही कसे काम करता हे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss