Saturday, January 11, 2025

Latest Posts

अमित ठाकरेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सरवणकरांवर दबाव : माहिम मधुन माघार घेण्याचे आदेश

| TOR News Network |

Mahim Constituency Latest News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुंबईतील माहीम मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. माहीम मतदारसंघातून मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Amit Thackeray Latest News) तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. मात्र अमित ठाकरेंसाठी ही पहिली निवडणूक असून ते विजयी झाले पाहिजे यासाठी मोठ्या हालचाली सुरु आहेत.(Sada Sarvankar latest news) अशात आता सदा सरवणकर हे माघार घेणार असल्याचे बोललं जात आहे. (sada sarvankar to vidrol from mahim) त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सदा सरवणकर यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. त्यातच आता माहीम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. (Meeting on varsha for amit thackeray) या बैठकीला सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर उपस्थित होते.(samadhan sarvankar latest news) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री ही बैठक पार पडली. या बैठकीत सदा सरवणकर यांना माहीम मतदारसंघातून माघार घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे.

 “तुम्ही उमेदवारी अर्ज तुर्तास मागे घ्या, युती धर्माचे पालन करा. तुमच्यावर कुठेही अन्याय होऊ देणार नाही”, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना दिले.(Eknath shinde to samadhan sarvankar) त्यामुळे सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज भरणार का? माहीममधून माघार घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान शिवसेनेचा बालेकिल्ला अशी माहीम विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच महाविकासाआघाडीत ठाकरे गटाकडून महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.

Latest Posts

Don't Miss