Sunday, November 17, 2024

Latest Posts

परमबीर सिंग यांना सीबीआयचा मोठा दिलासा

Param Bir Singh Latest News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खंडणी वसुली प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. (Big Relaxation To Param Bir Singh)

परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजवून दिली होती. वेगवेगळ्या महत्त्वाच्या हॉटेल आणि बार मधून वसुली गोळा करायला लावले जातात, खंडणी गोळा करायला लावली जाते, असे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते.

त्यानंतर परमबीर सिंह आणि इतरांविरुद्ध खंडणी वसुल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. गुन्हा घडल्यानंतर पाच वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असे सीबीआयने अहवालात म्हटले आहे.(Cbi Says No Proof Against Param bir Singh)

२०१६-१७ मध्ये घडलेला हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे उपलब्ध झालेले नाहीत वा आक्षेपार्ह काहीही आढळलेले नसल्याने सीबीआयने ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करुन तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे..(Cbi Report Magistrate to close Case)

परमबीर सिंग यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात धमकावणे आणि खंडणीप्रकरणी जुलै २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आता सीबीआयने पुराव्यांअभावी तपास बंद करण्यासाठी अहवाल सादर केला आहे.

Latest Posts

Don't Miss