Saturday, January 11, 2025

Latest Posts

उच्च न्यायालयाचा धनगर समाजाला धक्का

| TOR News Network | Bombay High Court on Dhangar Community : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे.मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासर्वगीय आयोगाने नुकताच अहवाल दिला आहे. या अहवालातून मराठा समाज हा मागास आहे, हा निष्कर्ष असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.तर धनगर समाजानेही (Dhangar community) एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. रम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा धक्का दिला आहे.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाज आक्रमक झाले आहेत. धनगर समाजानेही (Dhangar community News) एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा धक्का दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. तसेच यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. आता धनगर समाजासमोर याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे.

जरांगे पाटील आता धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी मैदानात उतरणार

आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळल्या

धनगर समाजाला एसटी म्हणजे अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. (Dhangar Samaj Protest) मागच्या काही दिवसांत या आंदोलनाची तीव्रता वाढली होती. तसेच धनगर आरक्षणाबाबत कोर्टातही धाव घेण्यात आली होती. धनगर समाजाचा एनटीमधून एसटी प्रवर्गात समावेश व्हावा, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत होती. मात्र यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता आणि पडताळणी झालेली नाही, असे सांगत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांनी धनगर आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या आहेत.(The petition was dismissed For Dhangar Samaj) धनगर समाजाचा अनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणामध्ये समावेश करून नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची तरतूद करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती.

Latest Posts

Don't Miss