Saturday, January 11, 2025

Latest Posts

पुण्यात भाजपची लेट नाईट बैठक

Theonlinereporter.com – May 11, 2024 

Pune Bjp Latest News : महाराष्ट्रातही तीन टप्प्यांत मतदान झाले आहे. मात्र अद्यापही पुणे, नाशिक, मुंबईसह अनेक महत्वाच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून काल रात्री उशीरा पुण्यात भाजपची बैठक पार पडली.(Bjp Meeting in pune) पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मोठे नेते पुण्यात आहेत. (bjp big leaders in pune) या “लेट नाईट” बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत होते. (Bjp Late night meeting)

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी पुण्यात मतदान होणार आहे, (On monday fourth phase voting) त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची ही महत्वाची बैठक झाली. (Bjp important meeting) या बैठकीत तिसऱ्या टप्प्यातील झालेल्या मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. (review conducted of third phase voting) तसेच चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाबाबत महत्वाची चर्चाही करण्यात आली. (fourth phase voting discussion)आगामी टप्प्यातील मतदानाच्या दृष्टिकोनातून पक्षाचे धोरण, मतदानाची घसरलेली टक्केवारी याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आरएसएसचे समन्वयक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली.

दरम्यान मावळ लोकसभेसाठी आज प्रचाराचा अंतिम दिवस असून आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मावळ लोकसभेत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रोड शो होणार आहे. (Cm shinde road show) तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांची बाईक रॅली असणार आहे. मावळ लोकसभेत एकूण 33 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यात प्रमुख पक्षाचे तीन उमेदवार असल्याने ही लढत तिरंगी होणार आहे. महायुती कडून श्रीरंग बारणे,महाविकास आघाडी कडून संजोग वाघेरे आणि वंचित बहुजन आघाडी कडून माधवी जोशी अशी तिरंगी लढत पाहयला मिळणार आहे. मतदार त्यांच्यापैकी कोणाच्या पारड्यात मत टाकून विजयी करतात, हे 4 जून रोजीच समजणार आहे.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस 

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान हे 13 मे रोजी होणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावतील.(Fourth phase voting on 13 may) शिरूर लोकसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडूनही दिग्गज नेत्यांच्या सभा आज मतदार संघात पार पडणार आहेत. महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार अमोल मिटकरी यांची सभा होणार आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री भास्करराव जाधव, चंद्रकांत हंडोरे, आमदार सचिन अहिर व प्रवीण गायकवाड यांच्या तोफा आज शिरूर लोकसभा मतदारसंघात धडाडणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार असून कोण कोणावर निशाणा साधते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss