Wednesday, January 15, 2025

Latest Posts

रात्रीस बैठका चाले : सागर बंगल्यावर रात्री 8 ते मध्यरात्री 1 पर्यंत काय घडले..

| TOR News Network |

Bjp Meeting Latest News : काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा फटका बसल्याने त्यांनी विधानसभेतील विजयासाठी कंबर कसली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल रात्री (शुक्रवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी झाली. (Bjp Meeting On Sagar Bunglow) या बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रात्री 8 ते मध्यरात्री 1 अशा 5 तास झालेल्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतील रणनीतीबाबत प्राथमिक चर्चा झाली. (Bjp Late Night Meeting) बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रावसाहेब दानवे पाटील, पंकजा मुंडे उपस्थित होते.(bjp Core Committee Meeting)

पुढील महिन्यात विधानपरिषद निवडणूक होणार असून भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत या निवडणुकांसदर्भात चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीसाठी कोअर कमिटीकडून 10 नावं निश्चित करुन ती यादी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहे.(Bjp Meeting on Vidhan parishad) राज्यातून पाठवलेल्या 10 नावावर दिल्लीत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील फायद्याचं गणित लक्षात घेऊन फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. (Bjp Meeting On Vidhan sabha) उमेदवारी देताना त्या उमेदवाराचा प्रभाव किती आहे, त्याच्यामुळे पक्षाला निवडणुकांमध्ये किती फायदा होऊ शकतो अशा 10 जणांची नावे दिल्लीला राज्यातून पाठवली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Bawankule on media)‘ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती. ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss