Sunday, January 12, 2025

Latest Posts

भाजपाला धास्ती; अजित पवारांच्या साथीचा विधानसभेतही फटका बसणार?

| TOR News Network |

Ajit Pawar Latest News : महायुती सरकारला परत सत्ता स्थापन करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. अशात महायुतीत असलेल्या अजित पवारांची साथ आता भाजपा आणि शिंदे गटाला नकोशी झाली आहे, अशा चर्चा सुरु आहेत. (bjp-sena don’t want ajit pawar in vidhansabha) पितृपक्षानंतर जागावाटप जाहीर होणार असून, त्यापूर्वी अजित पवारांच्या पक्षाबाबत काय निर्णय घ्यावा, यासाठी भाजप पक्षश्रेष्ठीसुद्धा विचारमंथन करीत आहेत.(Bjp top leader brainstorming on ajit pawar) त्याच कारणास्तव केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचे महाराष्ट्र दौरे वाढले असून, ते आज मुंबईला येत आहेत.(Amit shah in Mumbai today)

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा महायुतीला काही फायदा झालेला नाही ही बाब आता भाजप पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात आली आहे.(no profit by ajit pawar to mahayuti in loksabha) लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका विधानसभेला बसू नये, याकरिता कशा पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत, याबाबत भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांना सत्तेत घेतल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला, असं उघडपणे सांगण्यात आलं होतं. (Rss slams bjp for taking ajit pawar in mahayuti)

यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा उशिरा का होईना, परंतु ही बाब मान्य केली आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांना सत्तेत घेण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांचा, नेत्यांचा पूर्वीपासूनच विरोध होता.(Shinde sena against ajit pawar in mahayuti) या कारणाने विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची घोषणा होण्याअगोदर अजित पवारांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, याकरिता मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरू आहे. ज्या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्या बारामती मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना १ लाख ४८ हजाराचं मताधिक्य मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका विधानसभेत बसू नये, याबाबत पूर्ण दक्षता भाजपाकडून घेतली जात आहे.(Loksabha impact must not felt IN Vidhansabha)म्हणूनच अजित पवार यांची भूमिका आणि त्यांची साथ याचा किती फायदा होईल, याकडे शिंदे गट आणि भाजपा बारकाईने लक्ष देऊन आहेत.

महाराष्ट्रात अजित पवार यांची साथ शिंदे गट आणि भाजपा यांच्यासाठी सध्या लाखमोलाची नाही. अजित पवार यांना बरोबर घेण्याबाबत अनेक बैठकांचं सत्र सुरू असून, पितृपक्षानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर असून, या दौऱ्यातसुद्धा अजित पवार यांच्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

Latest Posts

Don't Miss