Sunday, November 17, 2024

Latest Posts

महाराष्ट्राच्या सीमेवर Modi – Praful Patel यांच्यात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी (५ नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या शिवणीमध्ये (मध्यप्रदेश) प्रचार दौरा होता. तेथे जाण्यासाठी ते दिल्लीहून गोंदिया येथील बिरसी विमानतळावर सकाळी १० वाजता पोहचले. मात्र यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल पोहचले. (Mp Praful Patel Meets Prime Minister Narendra Modi) दोघात बराच वेळ बातचीत झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चोला उधान आले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याविषयी मोठी गोपनीयता बाळगण्यात आली होती. पंतप्रधान मोदी प्रचार सभेनंतर परत येऊन विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्ताने बिरसी विमानतळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. या करिता गोंदिया जिल्ह्यासह शेजारील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांतून पोलिस बळ, श्वान पथक, बॉम्ब शोध पथक, अशी विविध पथकांसह अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. मागील चार दिवसांपासून हा परिसर ताब्यात घेण्यात आला होता. तीन दिवसांपासून पोलिसांच्या विविध पथकांची मॉकड्रिल सुरू होती.अशात पंतप्रधान आज विमानतळावर पोहचले.पंतप्रधान मोदी यांचे बिरसी विमानतळावर आगमन झाल्यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि पटेल यांच्यात चर्चा झाली. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विकास कामे, बिरसी विमानतळावरून १ डिसेंबरपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा प्रारंभ होत आहे, भविष्यात या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू झाल्यास तांदूळ व अन्य कृषी मालाची निर्यात करण्यास मदत होईल. शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल आदी विषयांवर चर्चा केली.या दोघांच्या भेटीनंतर राजकीय मंडळीत चर्चेला उधान आले आहे.

Latest Posts

Don't Miss