Monday, January 13, 2025

Latest Posts

विदर्भातून फडणवीसांना मोठा धक्का : बड्या नेत्याचा काँग्रेस प्रवेश

| TOR News Network |

Bjp-Congress Latest News : ऐन विधासभा निवडणूकांच्या तोंडावर विदर्भातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसणार आहे. भंडार गोंदीया मतदार क्षेत्राचे माजी खासदार हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. शिशुपाल पटले असं त्या नेत्याचे नाव असून 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदार संघातून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. (Shishupal Patle to Join Congress) पोवार समाजाचे नेते म्हणून शिशुपाल पटले यांची ओळख आहे. भंडार गोंदीया मतदार संघात त्यांची मोठी ताकद आहे.

काही दिवसांपूर्वी शिशुपाल पटले यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली नव्हती. त्यांनी राजीनामा दिल्यावर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आता शिशूपाल पटले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होत असताना पोवार समाजातील महत्वाचे नेते असलेले पटले पक्ष सोडत असल्यामुळे भाजपला धक्का मानला जात आहे. 2004 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केले होते.

शिशुपाल पटले हे पोवार समाजाचे नेते आहेत. त्यांची राजकीय ताकद मोठी आहे. भंडार गोंदीया मतदार संघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजप सोबत एकनिष्ठ राहिले होते. परंतु वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना डावलले गेले. त्यांना पक्षीय कार्यक्रमात न बोलावणे, कार्यक्रमांच्या पत्रिकेत त्यांचे नाव न टाकणे, व्यासपीठावर स्थान न देणे, भाषण करण्याची संधी न देणे, असे प्रकार पटले यांच्यासोबत झाले. त्यामुळे ते भाजपमध्ये नाराज झाले. पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे, असा आरोप करत त्यांनी 25 जुलै रोजी भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला होता.

Latest Posts

Don't Miss