Saturday, January 11, 2025

Latest Posts

सरकारने आपला शब्द पाळला नाही – बजरंग

Bajrang Punia Latest News On Government: क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या जवळील व्यक्तींना महासंघाची निवडणूक लढण्यास परवानगी देणार नसल्याची शाश्वती दिल्यानंतरच कुस्तीगिरांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आता ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने सरकारने आपला शब्द न पाळल्याची आमची भावना असल्याचे मत भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने व्यक्त केले. (Bajrang punia Statement After The Election Of The Wrestling Federation)

ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करताना विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासह भारताच्या आघाडीच्या कुस्तीगिरांनी वर्षांच्या सुरुवातीला दिल्लीत आंदोलन केले होते.आता हे तिघेही परत प्रसार माध्यमांसमोर आले असून त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली व आपल्या भावना व्यक्त केल्या.या वर्षांच्या सुरुवातीपासून चर्चेत राहिलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक अखेर गुरुवारी पार पाडली. ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली.त्यांच्या निवडीवर विनेश फोगटने नाराजी व्यकित केली.‘संजय सिंहसारख्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड होणे ही फारच दु:खद बाब आहे. त्यांच्या निवडीमुळे भविष्यातही महिला कुस्तीगिरांच्या शोषणाची भीती आहे. यापूर्वी जे बंद दारामागे घडत होते, ते आता सर्वासमोर घडेल. या देशात न्याय कसा मिळवायचा हे ठाऊक नाही. कुस्तीचे भविष्य अंधारात आहे,’’ अशी प्रतिक्रिया विनेशने व्यक्त केली.तसेच संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी निवड झाल्याने भविष्यातही महिला कुस्तीगिरांना शोषणाला सामोरे जावे लागण्याची भीती कायम आहे, असे वक्तव्य राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती कुस्तीगीर विनेश फोगटने केली.‘‘मी बजरंगसोबत गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. महिला कुस्तीगिरांची नावे आणि त्यांना काय भोगावे लागले आहे, याबाबत आम्ही त्यांना सांगितले होते. या प्रकरणात लक्ष घालण्याची आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिले होते. मात्र, तीन-चार महिने झाले तरी काहीही घडले नाही. त्यामुळे आम्ही जंतर-मंतर येथे आंदोलन पुकारले होते,’’ असे विनेश म्हणाली.

Latest Posts

Don't Miss