Thursday, January 16, 2025

Latest Posts

माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत, बच्चू कडूला पाहून घेऊ

| TOR News Network |

Bacchu Kadu Latest News : नेहमीच चर्चेत असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आहे.(Bacchu Kadu’s life in danger) आमदार बच्चू कडू यांनी स्वत: या संदर्भात जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे.(Bacchu Kadu letter to police)

गोपनीय माहितीनुसार, माझ्या जिवीताला धोका आहे, असं बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. (Someone Threatening To my Life) माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत.(Bacchu Kadu Accident Call) अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे.

सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे.(Bacchu Kadu had Y Security) बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. बच्चू कडू हे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. नेहमीच ते रोखठोक, स्पष्ट भूमिका घेतात. बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहलेल्या पत्रातील हे ठळक मुद्दे नमूद करण्यात आले आहेतयत्यात “शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथे राहत असून माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत.बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले, तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाहीत, तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार.

बच्चू कडू म्हणजे काहीच नाही, बच्चू कडूला पाहून घेऊ. आज मोका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे गेल्या अनेक दिवसापासून मतदारसंघातील नागरिकांचे बच्चू कडू यांना फोन येत आहेत. भाऊ तुमचा अपघात झाला का ?

Latest Posts

Don't Miss