Saturday, January 11, 2025

Latest Posts

लातूरमध्ये काँग्रेसला धक्का : डॉ अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर

| TOR News Network | Dr. Archana Patil Chakurkar News : काँग्रेस मधील गळती थांबायचे नाव घेत नाही.एका पोठोपाठ एक एक दिग्गज नेते काँग्रेसला राम राम ठोकत आहेत.आता काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डॉ अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत. (Archana Chakurkar to join bjp)

नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता लातूमधून देखील डॉ.अर्चना पाटील चाकूकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. असं झाल्यास लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. (Archana Patil to left Congress)

काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा राजीनामा

मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश.काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश.काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश. गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश.

उत्तम जानकर यांची फडणवीस यांच्याकडून नाराजी दूर

माढा लोकसभा मतदारसंघात भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी नाराजीतून हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या माळशिरसचे भाजपचे नेते उत्तम जानकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नाराजी दूर झाल्याचे समजते. या भेटीने मोहिते पाटील गटाला मात्र धक्का असल्याची चर्चा सुरु आहे.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवित माढा लोकसभा मतदारसंघात भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावा गावात जाऊन जनतेची गाठभेट घेत आहेत. गाव भेटी दौऱ्यादरम्यान मोहिते पाटील हे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मतं जाणून घेत आहेत.

Latest Posts

Don't Miss