Thursday, January 16, 2025

Latest Posts

देशमुख म्हणालेत बघुया..अव्हाड म्हणतात “ही श्रींची इच्छा”

| TOR News Network |

Vidhan sabha Latest News : राज्यात विधानसभा निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.यंदाच्या लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेले यश बघता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.(mahavikas Aghadi News) अशात महाविकास आघाडीतून सोडून गेलेल्या आमदारांची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mla Return News) त्यावर बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh on Left Mla) यांनी बघूया तर जितेंद्र आव्हाड यांनी ही श्रींची इच्छा अशी प्रतिक्रीया दिली आहे.( Jitendra Awhad On left Mla)

  राज्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपलं मत व्यक्त केलंय.(Anil Deshmukh on Vidhan sabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली, यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख या बैठकीला आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

अजित पवार यांच्या पक्षाचे अनेक आमदार संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय, याबाबत देशमुख यांना विचारलं असता ते म्हणाले, ज्या पद्धतीचा निकाल लोकसभा निवडणुकीत लागला आहे, ते पाहता जे आमदार सोडून गेले होते त्यांच्यात चुळबूळ सुरु असून अनेकजण हे संपर्क करत आहेत. पुढील काळात काय होतंय हे बघुया असंही यावेळी देशमुख म्हणाले.

यावरच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माझ्या संपर्कात कोणीही नाही. ज्यांच्या संपर्कात आहे ते लोक याविषयी बोलत असतील.” तसंच यावेळी आव्हाडांना पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना परत घेणार का? असं विचारलं असता “ही श्रींची इच्छा” असं ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss