Sunday, January 12, 2025

Latest Posts

टाईम आऊट प्रकरणात दिल्ली पोलीसांची उडी !

नाही तर तुमचा अँजेलो मॅथ्यूज होईलचा दिला संदेश

प्रकाश झोतात आलेले टाईम आऊट प्रकरणाची चर्चा काही थांबायचे नाव घेत नाही. एकीकडे या प्रकारामुळे अँजेलो मॅथ्यूजला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला असून आता तर यात चक्क दिल्ली पोलीसांनी उडी घेतली आहे. (Delhi Police jumped in Angelo Mathews Time Out Case) खबरदारी घ्या नाही तर तुमचा अँजेलो मॅथ्यूज होईल असाच काही संदेश दिल्ली पोलीसांनी दिला आहे.

यंदाच्या विश्वचषकातील श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यात अँजेलो मॅथ्यूला न खेळताच बाद देण्यात आले होते. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांना आता आयसीसीच्या विस्मरणात गेलेल्या टाईम आउट या नियमाचा परिचय झाला आहे.या प्रकरणात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याच्याकडेही विनंती देखील करण्यात आली होती. पण त्याने स्पष्ट नकार देत आयसीसी नियमांकडे बोट दाखवले. त्या नंतर समाज माध्यामावर बांगलादेश संघावर टीकास्त्रे सोडल्या गेली. हे सर्व सुरु असताना आता दिल्ली पोलिसांनी यात उडी घेतली आहे. सहाजिकच या प्रकरणात दिल्ली पोलीसांचे काय काम असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.मात्र दिल्ली पोलीसांनी या टाईम आऊट प्रकरणाची संधी घेत त्याचं सोनं केले आहे. अँजेलो मॅथ्यूज मैदानावर खेळण्यास गेला असता त्याच्या हेल्मेटचा पट्टा त्याला तुटलेला दिसून आला आणि सामना खेळताना त्याच्या सुरुक्षेच्या दृष्टीकोणातून मॅथ्यूजला हेल्मेट आवश्यक होते.हा नेमका प्रकार दिल्ली पालीसांनी हेरला. त्यांनी याच घटनेचा दाखला देत दिल्लीकरांसह सर्वांना एक संदेश दिला आहे. दिल्ली पोलीसांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत दुचाकीस्वारांना हेल्मेटचं महत्व पटवून दिले आहे.दुचाकी चालवताना हेल्मेच किती महत्वाचे असते याची जाणीव करुन दिला आहे.हेल्मेट घातले नाही तर तुमचा अँजेलो मॅथ्यूज होऊ शकतो असाच काही संदेश दिला आहे.

Latest Posts

Don't Miss