Thursday, January 16, 2025

Latest Posts

अहमदाबादची पिच काय सांगते: India Vs Australia Final

पिच क्युरेटरनं व्यक्त केला हा अंदाज

How Will be the Pitch Ahead Of Cricket World Cup Final 2023: रविवारी भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया असा विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे.या सामन्यात सर्वात महत्वाची भूमिका ही खेळपट्टीची असणार आहे. खेळपट्टी गोलंदाजीला की फलंदाजीला साथ देईल याची चर्चा आता रंगत आहे.पिच क्युरेटर यांनी या बद्दल आपला अंदाज व्यक्त केला आहे. ( Pitch Report for World Cup Final 2023 )

यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ सलग १० सामने जिंकून अजिंक्य आहे. ही किमया ऑस्ट्रेलियाला जमलेली नाही. साखळीतील सुरुवातीचे दोन सामने त्यांनी गमावले. त्यानंतर त्यांनी सलग सात सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ३ गडी राखून पराभव करत कांगारुंनी अंतिम फेरी गाठली.अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पिच क्युरेटरनं महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘अंतिम सामन्यात ३१५ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला जाऊ शकतो. अहमदाबादची खेळपट्टी साधारणत: फलंदाजांना मदत करते. पण आयसीसीची स्पर्धा असल्यानं आणि त्यातही अंतिम सामना असल्यानं खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना सहाय्य करणारी असेल. पहिल्या डाव्यात ३१५ किंवा त्याहून अधिक धावा केल्यास जिंकण्याची शक्यता अधिक असेल. कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणं कठीण होईल,’ अशी माहिती क्युरेटरनं दिली.आपल्या देशात, आपल्या खेळपट्टींवर खेळायचा थोडासा फायदा मिळतो.सुरुवातीच्या काही षटकांमध्ये खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. चेंडू स्विंग होईल. पण त्यानंतर खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नाही.

Latest Posts

Don't Miss