Monday, November 18, 2024

Latest Posts

वेदांत अग्रवालच्या कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध

| TOR News Network |

Pune Porsche Car Accident Case Update :  पुणे येथील अपघातामुळे प्रकाश झोतोत आलेल्या अग्रवाल कुटुंबासंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कुटुंबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शनही असल्याची माहिती समोर आले आहे. या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचा त्यांच्या भावासोबत संपत्तीसंदर्भात वाद झाला होता. या वादात सुरेंद्र यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती. (Vedant agrawal father’s underworld connection) या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा एफआयआर दाखल करण्यात आला होता. आधी याप्रकरणी पोलिसांनी तपास केला. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीचे आजोबा एसके अग्रवाल उर्फ ​​सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात सध्या मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. एसके अग्रवाल यांचा भाऊ आरके अग्रवाल यांच्यासोबत काही मालमत्तेवरून वाद झाला होता. (Property dispute in agrawal family) यावर तोडगा काढण्यासाठी सुरेंद्रने छोटा राजनशी हातमिळवणी केली होती. (Vedant Agrawal father’s connection with Chhota Rajan) इतकंच नाही तर या संदर्भात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी बँकॉकला जाऊन छोटा राजनचा गुंड विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ ​​विजय तांबट याची भेट घेतल्याचा आरोप आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवरील सर्व खटले सीबीआयने एकत्र करून तपास केले आहेत. सर्व खटल्यांच्या सुनावणीसाठी मुंबईत विशेष ट्रायल कोर्ट नेमण्यात आले आहे. पुण्यातील या प्रकरणातही एसके अग्रवाल आणि राजन आणि इतरांविरुद्ध २०२१ पासून खटला सुरू आहे.

यापूर्वी या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडे होता. नंतर ते सीबीआयकडे सोपवण्यात आले. गुन्हेगारी कट रचणे, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. शस्त्रास्त्र कायद्याची काही कलमेही लावण्यात आली आहेत. मात्र, छोटा राजन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा सहभाग असूनही पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली नाही,असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Latest Posts

Don't Miss