Sunday, January 12, 2025

Latest Posts

चालंय काय : काल भुजबळ आणि आज सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal) सोमवारी अचानक सिल्व्हर ओकवर शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेण्यासाठी दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच आज अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar At Modibagh) मोदीबागेत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदीबागेत असतानाच सुनेत्रा पवार तिथे पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.(Supriya Sule At modibagh)

आज शरद पवार, सुप्रिया सुळे मोदीबागेतील निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये दाखल झाल्या होत्या. (Sunetra Pawar Reachet Modibagh) तब्बल तासभर सुनेत्रा पवार तिथे होत्या. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांनी कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता आहेत. जवळपास तासभर तिथे थांबल्यानंतर सुनेत्रा पवार तेथून रवाना झाल्या. (Sunetra Pawar Stay 1 hour at modibagh) यावेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतली का? याबद्दल चर्चा रंगली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

विधान परिषद निवडणुकनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.(Sharad Pawar In Action Mode) शरद पवार महाराष्ट्राच्या सहा दिवस दौऱ्यावर असणार आहेत. सोमवारीत शरद पवार पुण्याला रवाना झाले. सोमवारी दुपारी तीन वाजता ते पुण्यासाठी निघाले होते. बुधवारी शरद पवार यांचा पुण्यातील बालगंधर्व येथे कार्यक्रम होणार आहे.

भुजबळ आणि पवारांच्या भेटीमुळं राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. पवारांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषेद घेत ही भेट राजकीय नसल्याचं स्पष्ट केलं. (Pawar Meet was not political)”महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक जे आहे ते मराठा समाजाचं हॉटल आहे तर तिथे जात नाहीत. काही लोक ओबीसी समाजाचं दुकान असेल तिथे मराठा समाज जात नाही. राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची एक जबाबदारी आहे. ही शांतता  राखली पाहिजे,’ असं भुजबळांनी म्हटलं.

भुजबळ पुढे म्हणतात, ‘पवारांचं असं म्हणणं होतं की जरांगेंना मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय चर्चा केली. आश्वासने दिली हे आम्हाला माहिती नाही.(Cm Shinde Meet Jarange Patil) तुम्ही हाकेंचं उपोषण सोडायला गेलात तेव्हा त्यांना काय सांगितले याची आम्हाला कल्पना नाही. जरांगेंना मंत्री भेटले ते काही माहिती नाही, यावर मी त्यांना म्हटलं की ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही आज राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत. सर्व सामाज घटकांची जिल्ह्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री, उपमुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजण्याचे कारण नाही. त्यामुळं तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे,’ असंही भुजबळांनी म्हटलं आहे.(Sharad Pawar Should Take Situtation in Cantrol)

Latest Posts

Don't Miss