Sunday, January 12, 2025

Latest Posts

रायगडमध्ये तीन अनंत गीते आणि दोन सुनील तटकरे मैदानात

| TOR News Network | Raigad Lok Sabha Latest News : रायगडमध्येही सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. आरोपप्रत्यारोपाने रायगडची भूमी तापली आहे. ठाकरे गटाने अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांना मैदानात उतरवलं आहे.(Anant Geete vs Sunil Tatkare) दोन्ही मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने रायगडमध्ये टफ फाईट होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Tough fight in raigad) दोन्ही नेत्यांनी विजयासाठीचं प्लानिंग केलंय. विजय निश्चित करण्यासाठी कंबर कसली आहे. पण हे सर्व सुरू असताना माशी शिंकलीय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.(Raigad candidate headache has increased)

या दोन्ही नेत्यांच्या विरोधात त्यांच्याच नावाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गंगाराम गीते मैदानात असताना अनंत पद्मा गीते या अपक्ष उमेदवारानेही अर्ज भरला आहे. हे कमी की काय अनंत बाळोजी गीते नावाच्या दुसऱ्या उमेदवारानेही उमेदवारी दाखल केली आहे. (Anant geete in raigad lok sabha)त्यामुळे दोन दोन अनंत गीते मैदानात उतरल्याने ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची डोकेदुखी वाढली आहे.

बरं रायगडमध्ये एकट्या अनंत गीते यांचीच डोकेदुखी वाढलेली नाही. तर सुनील तटकरे यांचीही डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादीचे सुनील दत्तात्रय तटकरे यांच्या विरोधात त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या सुनील दत्ताराम तटकरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. (Sunil tatkare in raighad lok sabha) त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनाही टेन्शन आलं आहे.

फक्त दोन हजारांनी पराभव

तुम्ही म्हणाल, नाम साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरला म्हणून काय झालं? जे नेते प्रसिद्ध आहेत, ते तर सर्वांना माहीत आहेच ना. सेम नाव असलेल्या व्यक्तीने निवडणूक लढवली तर असा कितीसा फरक पडणार आहे? तुम्हाला जर असं वाटत असेल तर जरा 2014च्या निवडणुकीवरही नजर मारा. म्हणजे तुम्हाला कळेल सेम नाव असलेल्या व्यक्तीमुळे काय आणि कसा फरक पडतो? 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे उभे होते. या निवडणुकीत त्यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. याच निवडणुकीत सुनील तटकरे नावाचा अपक्ष उमेदवार उभा होता. त्याला 9 हजार 849 मते मिळाली होती. नाम साधर्म्यामुळे अपक्ष उमेदवाराकडे मते वळल्याने सुनील तटकरे यांचा पराभव झाल्याचं सांगितलं जातं.

Latest Posts

Don't Miss