Monday, January 13, 2025

Latest Posts

बारावीचा निकाल : कोकणातील मुलांनी मारली बाजी

| TOR News Network |

Maharashtra Board 12th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा  निकाल आज जाहीर करण्यात आला.(12th result 2024 ) यात कोकण विभागाने सातत्य राखले आहे.(Kokan division on top in 12th Exam 2024) गेल्यावर्षी सुद्धा कोकण विभागाने बाजी मारली होती.

इयत्ता १२ वीच्या निकालात राज्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीश यश मिळवले. ९ विभागीय मंडळांचा निकाल तसा जोरदार आहे. सर्व विभागीय मंडळांनी ९० टक्क्यांचा वर निकाल दिला आहे. पण कोकण विभागाने सरस निकालाची पंरपरा कायम ठेवली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक विभाग आहे.(Nashik on second in 12 th result) तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे.

राज्याचा बारावीच्या निकाल ९३.३७ टक्के इतका लागला आहे. (12th result 93.37 in maharashtra) नऊ विभागीय मंडळापैकी कोकण विभागाने ९७,५१ टक्क्यांसह बाजी मारली. (kokan division got 97.51 %) त्यानंतर नाशिक विभाग ९४.७१ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ९४.४४ टक्क्यांसह पुणे विभाग आहे.

इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकूण परीक्षार्थी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यातील 13 लाख 29 हजार 684 परीक्षार्थ्यांनी बाजी मारली. हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अर्थात निकालात यंदा पण मुलींनीच बाजी मारली आहे. (Girls on top in 12th result) मुलींचा निकाल ९५.४४ टक्के तर मुलांचा निकाल ९१.६० टक्के इतका लागला आहे.

आज २१ मे २०२४ रोजी बारावीचा निकाल ऑनलाईन पाहता येईल. दुपारी १ वाजता विद्यार्थी हे आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतील. (After 1 pm result will be online) नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली.

विभागवार  टक्केवारी

कोकण – ९७.५१, नाशिक – ९४.७१, पुणे- ९४.४४, कोल्हापूर- ९४.२४, छत्रपती संभाजीनगर- ९४.०८, अमरावती- ९३, लातूर – ९२.३६, नागपूर – ९२.१२, मुंबई-९१.९५

Latest Posts

Don't Miss