Friday, January 17, 2025

Latest Posts

ते १२ आमदार ठाकरे गटाकडे परतणार  

प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्या दाव्याने खळबळ

| TOR News Network | Asim Sarode Latest News : प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटातील तब्बल १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणार असे वक्तव्य केले आहे. इतकंच नाही, तर असीम सरोदे यांनी १२ आमदारांच्या नावांची यादी देखील वाचून दाखवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Advt Asim Sarode Big Statement)

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात वादळी सभा घेत असून भाजपसह शिंदे गटावर टीकेचा भडीमार करीत आहेत.(Uddhav Thackeray vs Eknath Shinde)

शिंदे गटातील अनेक आमदार – खासदार नाराज

शिवसेनेतून बंड करणाऱ्यांना धडा शिकवा, असं आवाहन ठाकरे गटाकडून मतदारांना केलं जात आहे. दुसरीकडे लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीत खल सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ एक आकडीच जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार तसेच खासदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (Many Mla,Mp Sad in Shinde group)अशातच असीम सरोदे यांच्या दाव्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.(Asim Sarode Big Statement) चंद्रपूर शहरात निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

 लवकरच ते आमदार परत येतील

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना असीम सरोदे म्हणाले, शिवसेना सोडून मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेलेले १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून ते परत येण्यास इच्छुक आहे. लवकरच ते परत येतील, असं सांगताना असीम सरोदे यांनी १२ आमदारांच्या नावांची यादीच वाचून दाखवली. सरोदेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Latest Posts

Don't Miss