•   Wednesday, October 14
देश

पश्चिम बंगालला एक हजार कोटींची तात्काळ मदत; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

नवी दिल्ली : 'अम्फान' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बंगालमध्ये सुरु असलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये त्वरित मदतकार्य करण्यासाठी पंतप्रधानांनी  मदत जाहीर केली.

संकटाच्या काळात केंद्र सरकार खंबीरपणे पश्चिम बंगालच्या जनतेसोबत उभे आहे असे सांगत, या चक्रीवादळात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या संकटात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50, मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केली. या संकटाच्या काळात केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून काम करेल, अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली. प्रभावित भागातील पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

त्यांनतर, पंतप्रधानांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्य सरकारकडून मदतीसाठीचे औपचारिक विनंतीपत्र मिळाल्यानंतर केंद्र सरकार चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी, आंतर-मंत्रालयीन पथके पश्चिम बंगालमध्ये पाठवेल. या पथकाने केलेल्या पाहणीच्या आधारावर पुढचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.

पंतप्रधान मोदी यांचा पश्चिम बंगालचा, या वर्षातला हा दुसरा दौरा आहे. उत्तरप्रदेश वगळता या वर्षात केवळ बंगालमध्येच पंतप्रधानांनी एक पेक्षा अधिक दौरे केले आहेत. याआधी 11-12 जानेवारीला पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या जयंती समारंभानिमित झालेल्या कार्यक्रमात नुतनीकरण झालेल्या चार वारसास्थळांचे लोकार्पण केले होते आणि बेलूर मठालाही भेट दिली होती.