नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान यावेळी नेमकं काय सांगणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 17 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपतंय. काल पंतप्रधानांनी देशाच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून संवाद साधला. त्याच आधारावर ते संपूर्ण देशातील परिस्थिती बघून लॉकडाऊनसंदर्भात पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे.